Hot Posts

6/recent/ticker-posts

काहीही झालं तरी यंदा नागेश थिटे यांना नगरसेवक करण्याचा शिवसैनिकांनी बांधला चंग

 काहीही झालं तरी यंदा नागेश थिटे यांना नगरसेवक करण्याचा शिवसैनिकांनी बांधला चंग





जस जसे मशाल तळपायला लागली तसतसे विरोधक लागले धास्तवायला

जिब्राईलभाई शेख यांच्या सामाजिक कार्याचा देखील शिवसेनेला होणार प्रभागात मोठा फायदा..

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

निवडणूक जाहीर झाल्यापासून शहराच्या पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक आठ मधून कोणाला शिवसेनेची उमेदवारी मिळणार याबाबत मोठी चर्चा होती.गत निवडणुकीत प्रभागातील पदाधिकारी आणि मतदारांमध्ये म्हणावा तसा समन्वय शेवटपर्यंत न टिकू शकल्याने या ठिकाणी विरोधी पक्षाचा उमेदवार नगरसेवक होऊ शकला. त्यामुळे काहीही झालं तरी यावेळी नागेश थिटे यांना नगरसेवक करायचंच अशी भीष्मप्रतिज्ञा या प्रभागातील शिवसैनिकांनी केली होती. आता तीच भीष्मप्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व प्रभागातील शिवसैनिकांना आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांना चांगलीच चालून आली आहे. ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी अगदी सावलीप्रमाणे अत्यंत लहान वयापासून शिवसैनिक म्हणून सोबत असलेल्या नागेश तथा नागजी थिटे यांना उमेदवारी देत त्यांच्या पक्षनिष्ठेला न्याय दिला. नागेश थिटे हे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे पश्चिम भागातील रामदास नाना थिटे यांचे सुपुत्र आहेत. सत्ता असो अथवा नसो सातत्याने त्यांनी शिवसेनेसोबत राहण्याची घेतलेली 
भूमिका त्यांच्या निष्ठेची जणू पोचपावती देते. त्यामुळेच त्यांना उमेदवारीची संधी या प्रभागातून देण्यात आली आहे.

चौकट

नागेश थिटे हे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार असून ओबीसी प्रवर्गातून शबाना बाबाजान शेख या निवडणूक लढवत आहेत. शबाना यांचे सुपुत्र जिब्राईल शेख हे या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नाव आहे. जिब्राइलभाई हे प्रत्येक घराघरात सामाजिक कार्याच्या रुपाने पोहोचलेले नाव आहे. त्यांची माणुसकी जपण्याची कला आणि सर्वसामान्यांना मदत करण्याची हातोटी निश्चितपणे या प्रभागातील अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करू शकली आहे. त्यामुळे जिब्राईलभाई शेख यांच्या प्रतिमेचाही मोठा फायदा शिवसेना उमेदवार नागेश थिटे आणि शबाना शेख यांना होताना दिसणार आहे.
शिवसेनेच्या विजयासाठी परिवर्तनाची ही मशाल आम्ही एकदिलाने घेऊन प्रचारात सक्रिय आहोत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. 
डॉ. संग्राम गायकवाड
युवा प्रचार प्रमुख शिवसेना
प्रभाग क्रमांक आठ

चौकट
विशेष म्हणजे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवार उज्वला अमर कांबळे या देखील याच प्रभागाच्या मतदार आहेत. त्यामुळे नागेश थिटे यांना या प्रभागातून मोठे मताधिक्य उज्वला कांबळे यांना नगराध्यक्ष पदासाठी देखील द्यावे लागणार आहे. त्यामुळे केवळ स्वतः विजयी होण्याबरोबर प्रभागातील अन्य दोन उमेदवारांना देखील मोठे मताधिक्य देण्यासाठी नागेश थिटे यांच्या मित्र परिवाराने आणि तमाम शिवसैनिकांनी मोठी यंत्रणा कामाला लावल्याचे आतापासूनच स्पष्टपणे जाणवत आहेत.मशाल चिन्हाच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागात जनसंपर्क वाढवण्यावर थिटे आणि शेख यांनी  दिलेला भर निश्चितपणे त्यांच्या विजयाची नांदी देत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments