Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत विकासाचा ध्वज उंचावत रमेश बारसकर आघाडीवर;धनुष्यबाण पॅनलला प्रचंड जनाधार

 मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत विकासाचा ध्वज उंचावत रमेश बारसकर आघाडीवर;धनुष्यबाण पॅनलला प्रचंड जनाधार





धनुष्यबाणाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे शिक्षित,संयमी आणि प्रामाणिक वृत्तीच्या असलेल्याने शहरातील महिलांकडून त्यांना दणदणीत प्रतिसाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, संपूर्ण मोहोळमध्ये आज नाव घेतले जाते ते रमेश बारसकर आणि त्यांच्या दमदार नेतृत्वाचे. शिवसेना (शिंदे गट) पॅनलच्या प्रचाराने शहरात अक्षरशः उत्साहाचे वादळ निर्माण केले असून, नागरिकांच्या प्रतिसादात वाढणारी ऊर्जा पाहता या निवडणुकीत धनुष्यबाण पॅनलने जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे.

शहराच्या एकूण विकासासाठी दूरगामी दृष्टिकोनातून आखलेली योजना, मोहोळच्या आजच्या समस्या ओळखून त्यावर ठोस उपाय सुचवणारी कार्यशैली आणि नागरिकांना आपलेपणाने भेटणारे नेतृत्व या तिन्ही गोष्टींनी रमेश बारसकर यांनी मोहोळकरांच्या मनात एक वेगळा विश्वास निर्माण केला आहे. सतत जनतेमध्ये राहून त्यांच्या अपेक्षा जाणून घेणाऱ्या बारसकर यांच्या ठाम व पारदर्शक भूमिकेमुळे त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढत असून शहरभर या नेतृत्वाचे मोठे कौतुक होत आहे.

अलिकडच्या काळात सुरू झालेली घरोघर संपर्क मोहीम ही शहराच्या राजकारणातील एक माइलस्टोन ठरली आहे. या मोहिमेत बारसकर व पॅनलमधील उमेदवार प्रत्येक घरात पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. वृद्धांची काळजी, महिलांच्या अडचणी, तरुणांच्या रोजगारविषयक आकांक्षा, शहरातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांची कमतरता या अनेक विषयांवर नागरिक बारसकर यांच्यासमोर अत्यंत मोकळेपणाने आपली मते मांडत आहेत. विशेष म्हणजे या समस्यांना केवळ ऐकण्यापुरते न थांबता, त्यांचे निराकरण करण्यासाठी स्पष्ट दिशा व वास्तववादी आश्वासन पॅनलने दिल्यामुळे नागरिकांमध्ये बारसकर यांच्याविषयीचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

मोहोळ शहराचा भविष्यकालीन विकास कसा असावा याची जाणीव ठेवून बारसकर यांनी केलेली शहराच्या कारभाराची आखणी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर असल्याचे नागरिकांना जाणवत आहे. शहराला स्वच्छ, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक करण्याचा त्यांचा संकल्प ही केवळ घोषणाबाजी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य असलेला दृढनिश्चय आहे. नागरिकांच्या दाराशी पोहोचून त्यांच्या समस्यांची नोंद घेणे, त्यावर व्यवहार्य उपाय सादर करणे आणि समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला उत्तरदायी ठेवण्याच्या त्यांच्या तळमळीमुळे बारसकर यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी ठरत आहे.

नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या सिद्धीताई वस्त्रे यांच्या उमेदवारीने या पॅनलची ताकद अधिक वाढली आहे. शिक्षित, संयमी आणि प्रामाणिक वृत्ती असलेल्या सूत्रे यांच्या निवडीला शहरातील महिलांकडून दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. स्त्री नेतृत्व सक्षमपणे पुढे आल्यास शहराच्या प्रशासनात नव्या पारदर्शकतेची व कामकाजात काटेकोरतेची पर्वा सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

प्रचारादरम्यान शहरभर फिरताना दिसणारा उत्साह, कार्यकर्त्यांची अखंड धावपळ, प्रत्येक भागातून मिळणारे स्वागत आणि नागरिकांनी दिलेला निखळ पाठिंबा पाहता मोहोळमध्ये धनुष्यबाण पॅनलचा जनाधार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरिकांनी बारसकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना शहराच्या भवितव्याची खात्री देणारे नेतृत्व म्हटल्याचे ऐकायला येते. शहरात चर्चेचा विषय एकाच नावाभोवती फिरताना दिसतो रमेश बारसकर म्हणजे विकासाची हमी.

निवडणुकीची तारीख जवळ येत असताना मोहोळ शहरात निर्माण झालेल्या जनभावनेने या निवडणुकीचे स्वरूप बदलून टाकले आहे. धनुष्यबाण पॅनलचा वाढता प्रभाव, नागरिकांचे उमडणारे प्रेम आणि नेतृत्वाविषयीचा अढळ विश्वास पाहता या निवडणुकीत शहराने मनोमन निर्णय घेतल्याचे स्पष्ट जाणवते.

मोहोळ आज एका नव्या अध्यायाच्या उंबरठ्यावर उभे आहे दिशादर्शक नेतृत्व, विकासाची बांधिलकी आणि जनतेचा जिव्हाळा यांचा मिलाफ झाल्यास शहराला केवळ बदल नाही, तर एक भक्कम, स्थिर आणि सुवर्णमय भविष्य मिळेल, असा दृढ विश्वास मोहोळकरांना वाटू लागला आहे.आणि या सर्व विश्वासाचा केंद्रबिंदू आहे.रमेश बारसकर आणि त्यांचा धनुष्यबाण पॅनल.


Reactions

Post a Comment

0 Comments