Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 10 मधून विजय मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार चैतन्यबापू देशमुख यांची निर्णायक मुसंडी

 प्रभाग 10 मधून विजय मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार चैतन्यबापू देशमुख यांची निर्णायक मुसंडी





सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी ठरवलेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट देतोय टक्कर

मोहोळ शहराचे जेष्ठ विकास मार्गदर्शक पद्माकरआप्पा देशमुख यांची निर्णायक रणनीती सुरू


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

सुरुवातीला एकतर्फी वाटणारी प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणूक आता काटे की टक्कर ठरताना दिसत आहे. या प्रभागातील भाजपच्या उमेदवारांना प्रचारामध्ये धोबीपछाड देत ज्येष्ठ विकास मार्गदर्शक तथा शिवसेना शिंदे पक्षाचे शेलारमामा ठरलेले पद्माकरअप्पा देशमुख यांनी सर्व निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हातात घेत संपूर्ण प्रभागातील राजकीय संपर्क मोठ्या प्रमाणात वाढवण्यास प्रारंभ केला आहे. त्यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक चैतन्यबापू देशमुख यांच्या उमेदवारीमुळे यापूर्वीच प्रभागातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना शिंदे पक्षाने यापूर्वीच्या नगरसेविका सुवर्णाताई गाढवे यांना उमेदवारी देत गाढवे आणि माने वस्तीच्या मतांची बेरीज करण्याचा क्षणाक्ष प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रचारात पद्माकरआप्पा देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच ताकदीने आणि क्षमतेने यापूर्वीचे प्रभागाचे मार्गदर्शक आणि भाजपातून आता शिवसेना शिंदे पक्षात आलेले सुरेशदाजी गाढवे हे प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे त्याचा मोठा फायदा गाढवे आणि देशमुख या दोन्ही उमेदवारांना होताना दिसत आहे.

चौकट
यापूर्वी मत विभागणीची शक्यता गृहीत धरत या प्रभागात शिवसेना शिंदे गटाला विजय सोपा नाही अशी धारणा प्रभागातील अनेक चाणाक्ष लोकांची होती. मात्र भाजपला तितक्याच क्षमतेने विरोध करणारा आणि निवडणुकीत सक्षम प्रचार यंत्रणा राबवणारा देशमुख परिवार निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यामुळे या निवडणुकीत आता काटे की टक्कर होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सर्वस्वी धुरा पद्माकरआप्पा देशमुख हे एकहाती सांभाळत असल्यामुळे प्रभागातील अनेक मोठे मासे हळूहळू देशमुखांच्या गळाला लागत असल्याचे सध्यातरी जाणवत आहे.

चौकट
या निवडणुकीच्या पडद्याआडची रणनीती जायंट किलर धोरणाने यशस्वी करत सर्व प्रचार यंत्रणा अगदी सक्षमपणे राबवणारे युवा उद्योजक आणि निवडणुकीचे मास्टर प्लॅनर प्रसाद देशमुख यांनी प्रभागातील विकासासाठी काय काय उपाययोजना करता येतील ? याशिवाय प्रभागातील सर्वसामान्यांना तात्काळ कोण कोणत्या सोयी सुविधा पुरवता येतील ? यासाठीची शिस्तबद्ध आखणी करत प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामध्ये त्यांना मोठे यश आणि प्रतिसाद मिळताना दिसत असून या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठाच उमेदवार चैतन्यबापू देशमुख यांना विजयाच्या दिशेने नेताना दिसत आहे. देशमुख परिवारातील सर्व सदस्य एकदिलाने आणि प्रचंड उत्साहाने प्रभागात सर्वत्र जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असून त्यांना प्रभागात मोठा प्रतिसाद वाढल्याचे जाणवत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments