Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या प्रभाग १ बालेकिल्ल्यात सत्यवान देशमुख आणि स्वप्नाली जाधव यांचा विजय निश्चित

 स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या प्रभाग १ बालेकिल्ल्यात सत्यवान देशमुख आणि स्वप्नाली जाधव यांचा विजय निश्चित





प्रचंड जनसंपर्काच्या मशालीच्या प्रचाराच्या झंझावाता पुढे सर्वपक्षीय विरोधक अक्षरश:  हतबल
ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांच्या चाणाक्ष रणनीतीमुळे प्रभागात शिवसेनेची सरशी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ शहरातील राजकीय जडणघडणीचा गेल्या ४० वर्षापासून चा केंद्रबिंदू असलेल्या प्रभाग क्रमांक एक मधील लढतीकडे संपूर्ण शहराचे नाही तर तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रभागातून शिवसेना उमेदवारीची मशाल कोणाच्या हातात देणार ? आणि कोणता शिवसेनेचा शिलेदार या प्रभागाचे नगर परिषदेत नेतृत्व करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या प्रभागातून सर्वसाधारण प्रवर्गातून माजी नगरसेवक सत्यवान देशमुख यांना तर ओबीसी महिला प्रवर्गातून युवा उद्योजक सचिन जाधव यांच्या सुविद्य पत्नी स्वप्नाली सचिन जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात शिवसेना उबाठा पक्षाच्याच उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.
युवा नेते सचिन जाधव यांचा प्रभागातील मोठा जनाधार आणि निर्णायक वोट बँक लक्षात घेता दोन्हीही उमेदवारांना उमेदवारीची घोषणा होताच या प्रभागातील शिवसेना पक्षाचे पारडे मजबूत झाल्याचे त्याचवेळी सर्वांना जाणवले होते. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळत असलेल्या जोरदार प्रतिसादामुळे या प्रभागातील मशाल चिन्हाच्या वाढत्या प्रभावाची चिंता सर्वपक्षीय विरोधकांना आता चांगलीच वाटायला लागली आहे. बऱ्याच जणांना आतापासूनच मशालीला मिळत असलेला पाठिंबा स्पष्टपणे जाणवत असल्यामुळे आतापासूनच गर्भगळीत झाले आहेत.

चौकट
जाधव परिवारातील सचिन जाधव आणि धनाजी जाधव या बंधूंच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रत्येकाशी नित्यसंवाद असलेला हा हा प्रभाग शिवसेनेचा तर बालेकिल्ला आहे. मात्र शहराबाहेरच्या नेत्यांचे पाठबळ घेऊन प्रभागात ताकद दाखवायला आलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांना आता स्थानिक मतदारांनी आपली स्थानिक अस्मिता स्पष्टपणे दाखवत हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे ठरवले आहे. शिवसेना हाच आमचा पक्ष आणि मशाल हेच आमचे चिन्ह असल्याची बाब शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार सत्यवान देशमुख आणि स्वप्नाली जाधव यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून जाणवत आहे.
चौकट
प्रभाग क्रमांक एक मधील जाधव परिवार हा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, माणुसकीची जाण ठेवणारा आणि प्रत्येकाला आपुलकीची वागणूक देणारा परिवार म्हणून सर्वश्रुत आहे. या परिवाराची प्रभागातील लोकप्रियता लक्षात घेऊनच जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर, जेष्ठ शिवसेना नेते दीपक गायकवाड, महिला आघाडीच्या नेत्या तथा नगरसेविका सीमाताई पाटील यांनी या प्रभागातून जाधव परिवाराच्या स्नुषा स्वप्नाली यांना उमेदवारीची महत्त्वपूर्ण संधी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताच जाधव परिवाराने या प्रभागातील प्रत्येक सर्वसामान्यांशी असलेला यापूर्वीचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवत प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रचाराची रणनीती आखली आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments