मोहोळ (कटूसत्य वृ त्त):- धनगर समाजाचे प्रश्न, परंपरा आणि हक्क यासाठी क्षीरसागर कुटुंबाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. नागनाथ क्षीरसागर यांनी तसेच त्यांच्या संपूर्ण परिवाराने धनगर समाजाच्या रूढी-परंपरांचे जतन करत समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे, असे मत ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपने शितल सुशील क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांचा ‘सुशील’ स्वभाव, संघटन कौशल्य आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन यामुळे शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असेही देशमुख म्हणाले.
मोहोळकरांनी शितल क्षीरसागर यांना विजयी केल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही, अशा शब्दात देशमुख यांनी मतदारांना आवाहन केले.

0 Comments