मोहोळ शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचे व्हिजन राबवण्यासाठी भाजपाला संधी द्यावी : शितल सुशील क्षीरसागर
मोहोळ शहराच्या पूर्व भागात नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांची जनसंवाद रॅली
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व सामान्य बंधू-भगिनींशी मोठ्या प्रमाणात संपर्क आणि व्यापक स्वरूपात चर्चा देखील झाली. शहराच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य मतदार बंधूभगिनींचे बहुमोल आशिर्वाद आणि प्रेम लाभले. सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींची आपुलकी आणि जिव्हाळा यामुळे निश्चितपणे मी भारावून गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्थ नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारभाऊ गोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी यापुढील काळातील सोलापूर जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांनी संधी दिल्यास निश्चितपणे भाजपाचे शाश्वत विकासाचे व्हिजन राबवण्यास मोठा हातभार लागेल असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितलताई सुशील क्षीरसागर यांनी केले.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार आणि जनसंवाद रॅलीच्या निमित्ताने मोहोळ शहराच्या पूर्व भागात शितलताई क्षीरसागर यांनी प्रचार दौरा पूर्ण केला यावेळी त्यांनी प्रभागातील अनेक ज्येष्ठ कनिष्ठ मंडळींशी संवाद साधत त्यांच्याशी निवडणुकीच्या बद्दल आणि विकास कामांबद्दल अत्यंत सकारात्मक शैलीने चर्चा देखील केली. यावेळी प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार आबासाहेब रेवणसिद्ध आंडगे व लक्ष्मी संतोष खंदारे यांच्या समवेत आयोजित केलेल्या जनसंवाद रॅलीला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी युवा नेते सोमेश क्षीरसागर, निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर, ज्योती सोमेश क्षीरसागर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजीव खिलारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकरराव वाघमारे, युवा नेते,सोमेश क्षीरसागर, छगन अष्टुळ,रावसाहेब चोरमोले, पंकज असवरे, प्रवीण सोनवणे, नवनाथ चव्हाण, द्रोणाचार्य लेंगरे, सागर लेंगरे बबन शिंदे, भारत कटके,नारायण शिंदे,सुरेखा खंदारे, नलिनी असवरे, लीना वायदंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांमुळे, पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नांमुळे जनतेच्या मनात भाजपाबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. या रॅली दरम्यान नागरिकांनी देऊ केलेला आशीर्वाद हा भाजपाच्या विजयी पताकेला बळ देणारा आहे. मोहोळ शहराच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपाने निर्णय आघाडी घेतली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह सर्वच्या सर्व दहा प्रभागातील वीस उमेदवारांना प्रचारादरम्यान मोठा आणि सकारात्मक स्वरूपात मिळत असला पाठिंबा येत्या काळातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा ठरत आहे.
सुशील भैय्या क्षीरसागर
मोहोळ निवडणूक प्रभारी भाजप


0 Comments