कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी व कृषी विभाग यांच्या संयुक्त श्रमदानाने कोरफळे तालुका बार्शी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला कृषी महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील एन. एस. च्या विद्यार्थ्यांनी तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानामध्ये सहभाग घेतला होता. पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध व्हावे, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढावी आणि शेतीला सिंचन मिळावे यासाठी हा बंधारा बांधला जातो. या बंधाऱ्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होण्यासाठी व भूजल पातळी मध्ये वाढ व्हावी या उद्देशाने या श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
श्रमदानासाठी तालुका कृषी अधिकारी कोयले, कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.शेंडे एस.एस, प्रा. गणेश जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी पाटील तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव , उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
.png)
0 Comments