Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपासोबत राहण्याचा जकराया परिवाराचा निर्णय

 मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपासोबत राहण्याचा जकराया परिवाराचा निर्णय




जकराया परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केला निर्णय

जकराया समुहाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना व्यक्त केला पाठिंबा


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
मोहोळ तालुक्यासह शहरातही शेतकरी आणि जनतेत मोठी आत्मियता आणि सहानुभूती असलेल्या जकराया परिवाराने मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पाठराखण करण्याचा निर्णय भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला आहे. जकराया शुगरचे चेअरमन तथा परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी आज भाजपच्या सर्व उमेदवारांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. 

सध्या मोहोळ शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे.भाजपच्या वतीने माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी सौ.शीतल क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर सचिन जाधव यांनी आज (रविवार) नगरपरिषदेच्या निवडणुकीतील भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक मोहोळ जकराया मल्टिस्टेटच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर,माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे,सुशील क्षीरसागर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला कारखाना म्हणून जकराया शुगरची ओळख आहे.जकराया प्रतिष्ठानच्या  माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून या परिवाराने जनतेत मोठी सहानुभूती मिळविली आहे.या परिवाराचे मोहोळ शहरातही मोठे हितचिंतक आणि सदस्य आहेत.त्यामुळे जकराया परिवाराची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर जकराया परिवार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही या परिवाराचे प्रमुख सचिन जाधव यांनी सर्व उमेदवारांना दिली.

यावेळी ,नाना डोके,मुजीब मुजावर,विष्णूपंत चव्हाण,विशाल डोंगरे,नवनाथ चव्हाण ,प्रभाकर डोके,ज्योती क्षीरसागर,प्रशांत गाढवे,सागर लेंगरे,आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments