Hot Posts

6/recent/ticker-posts

विरोधी आकसाच्या अधोगतीपेक्षा भाजपाच्या विकास समृद्धीतून प्रगती साधूया

 विरोधी आकसाच्या अधोगतीपेक्षा भाजपाच्या विकास समृद्धीतून प्रगती साधूया



मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या नगराध्यक्ष शितल सुशील क्षीरसागर यांच्यासह पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत यांचे आवाहन

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मी भारतीय जनता पार्टीचा गेले पंचवीस वर्षापासून चा कार्यकर्ता आहे. ' प्रथम देश नंतर पक्ष नंतर मी ' या विचारधारेने प्रेरित होऊन मी सामाजिक कार्य करतो आहे. आज केंद्रात , राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.असे सांगत आपणाला जर मोहोळ शहराचा विकास करावयाचा असल्यास त्यासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे.त्यामुळे जर आपणाला भरघोस निधी हवा असेल तर मोहोळकरांनी ही सत्तेतील पक्षाला विजयी केले पाहिजे.मोहोळ नगरपरिषदेच्या एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत यांनी केले.
      
भारतीय जनता पार्टी कडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार शीतल सुशीलकुमार क्षीरसागर , प्रभाग तीन मधून नगरसेवक पदासाठी 3 अ अझरुद्दीन जब्बार शेख, 3 ब रसना अमोल गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये घर भेट दौरा केला. या प्रचार अभियान प्रसंगी सतीश राऊत बोलत होते.

यावेळी सुरेश तथा पिंटू राऊत पुढे म्हणाले की, या प्रभागांमध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ  ग्रामपंचायत असल्यापासून आम्ही या प्रभागात अनेक विकासाची कामे केली आहेत.आणि आजही करत आहोत. आम्ही या प्रभागातील  बऱ्याचशा समस्या दूर करण्यासाठी आम्ही यशस्वीरित्या काम केलं आहे. परंतु ड्रेनेज पाईपलाईनच्या प्रमुख समस्येसह अन्य समस्या सोडवण्यासाठी या प्रभागातील मतदार  भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह अन्य उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील  असा मला विश्वास वाटतो असे ही सुरेश राऊत यावेळी म्हणाले.
      
 या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर,अझरुद्दीन जब्बार शेख,  रसना अमोल गायकवाड , मोहोळ निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर, राजेंद्र आदलिंगे, सत्यवान चौधरी, माजी सरपंच सारिका संजय क्षीररसागर, मुजीब भाई मुजावर, नवनाथ गाढवे, संतोष घोरपडे, संकेत आदलिंगे, श्रवण जावळे, काळुबाई देशमुख , वृषाली आदलिंगे ,डॉ. सुजाता गायकवाड ,अर्चना जावळे, ज्योती क्षीरसागर, सागर लेंगरे, शकील  शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट ..

' भाजपा च्या नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहावे ' 

ग्रामीण तीर्थक्षेत्र ' ब ' वर्ग दर्जा असलेल्या श्री नागनाथ महाराज मंदिरास भक्त निवास ( स्त्री-पुरुष ) करीता  आपण प्रत्येकी २५ लाखांचा निधी या पूर्वीच आणलेला आहे.  वाहन तळ प्रशस्त करणे, पाण्याची सोय करणे , नागनाथ मंदिराकरिता  वॉल कंपाउंड करणे, मंदिरा कडे  येण्यासाठी  रस्ता करण्याचे ही उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.या ही निवडणुकीत नगराध्यक्ष  शीतल क्षीरसागर यांच्या बरोबर सर्व २० नगरसेवकांच्या पाठीशी या प्रभागातील जनतेने उभे राहावे .
--- सुरेश राऊत , जिल्हाउपाध्यक्ष
Reactions

Post a Comment

0 Comments