अविनाश माने याची इंडियन आर्मी मध्ये निवड
भोसे (कटूसत्य वृत्त):- भोसे तालुका मंगळवेढा येथील युवक अविनाश रामा माने याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार स्वयं हार्डवेअर चे मालक सतीश भोसले व कुमार फुटवेअर चे मालक महावीर खडतरे यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास धनाजी घाडगे, विलास माने आधी उपस्थित होते.
अविनाश माने हा युवक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याने त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे प्रतिपादन सतीश भोसले यांनी सत्कार करतेवेळी व्यक्त केले.

0 Comments