Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

 पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न



    पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला निवडणूक व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने शनिवार (दि.२२)  नामसंकीर्तन  सभागृहात   निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर  प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एल सीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवुन आणि ईव्हीएम मशीन हाताळणी चे प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत अचुकपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. तसेच ईव्हिएम सीलींग व हाताळणी मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पध्दत आणि त्यावेळेस घ्यावयाची दक्षता या बाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
    प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, कोणत्याही प्रकारच्या चुका टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments