सोलापूरातून १०७ स्काऊट गाईड विद्यार्थी लखनऊला रवाना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर -जिल्ह्यातील स्काऊट गाईडचे १०७ विद्यार्थी व १२ शिक्षक लखनऊ (उत्तरप्रदेश ) येथे होणाऱ्या १९ व्या राष्ट्रीय जांबोरी मेळाव्यासाठी आज रवाना झाले. विकसित युवा विकसित भारत या संकल्पनेवर आधारित या महामेळाव्यात हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या मेळाव्यात देशभरातून ४० हजार विद्यार्थी सहभाग घेत आहेत.
या मेळाव्यासाठी श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला सोलापूर, श्री मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती, एस.व्ही. सी.एस. हायस्कूल होटगी, महाराष्ट्र विद्यालय बार्शी, स्वामी समर्थ प्रशाला अरळी, ज.रा. चंडक प्रशाला बाळे आदी शाळेतील ५५ स्काऊट,४५ गाईड विद्यार्थी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर युनिटमधील सात ओपन रोव्हर हे जिल्हा कॉन्टिजंट लीडर परमेश्वर चांदोडे व पुनम चव्हाण यांच्या समवेत अर्जुन सुरवसे, महेश कोरे, योगेश उपळकर, प्रकाश कारभारी, प्रकाश वाघमारे, कुशल घागरे आदी स्काऊट मास्टर अनिता हौदे, शोभा राणी कुंभार, पूजा कदम, वैष्णवी सगट आदी गाईड कॅप्टन लखनऊकडे रवाना झाले.या महामेळाव्यात कॅम्प क्राफ्ट, राज्य प्रदर्शन, शोभायात्रा, पायोनियरिंग प्रकल्प, ग्लोबल डेव्हलपमेंट, मार्च फास्ट, लोकनृत्य, फूड प्लाझा, साहसी उपक्रम व सांस्कृतिक देवाण-घेवाण असे विविध उपक्रम व कार्यक्रम घेतली जातात. या महामेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आपत्तीच्या कालावधीत द्यावयाची सेवा, स्वावलंबन व देशासाठी एक संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडविणे हे या मेळाव्याचे हेतू आहे.
जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा आयुक्त स्काऊट तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, जिल्हा आयुक्त गाईड तथा उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रूपाली भावसार, जिल्हाचिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विठ्ठल ढेपे, कोषाध्यक्ष तथा लेखाधिकारी सलगर, जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे व जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाठ, मुख्याध्यापक नंदकुमार धाये,दिंडुरे,पर्यवेक्षक श्रीशैल व्हनमाने यांनी शुभेच्छा दिले.

0 Comments