महासंघाची पूरग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रात राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने पूरग्रस्त निधी अक्षय पात्र कंपनी चे नावे रक्कम रुपये 40100/- चा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम यांना सुपूर्द करण्यात आला. सदर निधी हा महासंघाचे जिल्हा/ तालुका पदाधिकारी, महासंघाचे माळशिरस तालुकाध्यक्ष टीम तर काही सेवा निवृत्त कर्मचारी यांच्याकडून स्वेच्छेने देण्यात आला. यासाठी महासंघाचे दिनेश बनसोडे, धन्यकुमार काळे, प्रमोद धावड यानी विशेष प्रयत्न केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धनादेश देतेवेळी महासंघाचे दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, महेश केंद्रे, बसवराज दीदोरे, बंडू मोरे, सुरेश राठोड, वाले, सागर शेंडगे, कानीफनात चव्हाण,राजेंद्र सोनकांबळे, इस्माईल सय्यद, इ उपस्थित होते.
0 Comments