श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सुवर्णाताई नांगरे-पाटील यांचा सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आदर्शवत कार्य असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वासराव नांगरे-पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णाताई नांगरे-पाटील यांनी व्यक्त केल्या.
त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आल्या असता न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अमित तथा पप्पू लांडगे, इंद्रजीत बोरगांवकर हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे मनोज निकम, निखील पाटील, प्रवीण देशमुख, सौरभ मोरे, अतिश पवार, वैभव मोरे, योगेश कटारे, प्रवीण घाटगे, गोटू माने, विराज माणिकशेट्टी, समर्थ घाटगे, फहीम पिरजादे, शुभम सावंत, शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, बाबुशा महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments