सेवाभारतीच्या वतीने शिवनी तालुका उत्तर सोलापूर च्या गावात स्वच्छता मोहीम व धान्याचे किट वाटप - राजेश पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी या गावात शाळा व गावाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सेवाभारतीच्या वतीने तालुका उत्तर सोलापूर च्या शिवनी या गावात स्वच्छता मोहीम व धान्याचे किट वाटप करण्यात आले असल्याचे राजेश पवार पवार यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे प्रचंड व शाळेत साचलेला होता ते स्वच्छ करावे आणि लोकांना राहता यावे म्हणून सेवा भारतीच्या वतीने स्वच्छता मोहिमेतील तसेच त्यांच्यासोबत सदन शाळेच्या 60 मुली मिळून गाव व शाळा स्वच्छ करून दिल्या.
यावेळी गरज लोकांना धान्याचे किट व संसार उपयोगी वस्तू देण्यात आले. यावेळी बाबूलाल वर्मा, जिल्हा संघचालक सुनील इंगळे आदी उपस्थित होते.
0 Comments