Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलांनी खूप शिकावे- अमोल बापू शिंदे

 मुलांनी खूप शिकावे- अमोल बापू शिंदे



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनपा शाळेत शिकणारी मुले ही गोरगरिबांची, कामगारीची असतात. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य मनपा शिक्षकांचे आहे. मनपा महिला व बालकल्याण  समिती तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर कला शिक्षक फैय्याज शेख तर्फे चित्रकला वह्या वाटप करण्यात आले. त्यांचा आदर्श  इतर शिक्षकांनी देखील घ्यावा. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी मनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक 2, पंजाब तालीम येथे आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष फैय्याज शेख होते. कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हुमायून हरकारे, मुकेश ठाकूर ,नवाज हुंडेकरी उपस्थित होते .पाहुण्यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य बॅग ,टिफिन, पाणी बॉटल व चित्रकला वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सादिक बागवान यांनी केले. सूत्रसंचालन रुबीना पेरमपल्ली यांनी केले. दिलशाद हरकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments