सहकार महर्षिचा दिपावली सणाकरिता ऊर्वरीत ऊस बील रक्कम रु.१०० प्रमाणे बँकेत वर्ग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 8, 2025

सहकार महर्षिचा दिपावली सणाकरिता ऊर्वरीत ऊस बील रक्कम रु.१०० प्रमाणे बँकेत वर्ग

 सहकार महर्षिचा दिपावली सणाकरिता ऊर्वरीत ऊस बील रक्कम रु.१०० प्रमाणे बँकेत वर्ग



अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम 2024-2025 मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रती मे.टन रक्कम रु.2,800/- व दि.01/02/2025 रोजी नंतर गाळपास आलेल्या ऊसास अनुदानासह रक्कम रु.2,900/- प्रमाणे प्रथम ऍ़डव्हॉन्स ऊस बील ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांना अदा केले आहे. तसेच कारखान्याने तोडणी व वाहतूक यंत्रणेची सर्व बीले यापुर्वी अदा केली आहेत. कारखान्याने आज दि.06/10/2025 रोजी दिपावली सणाकरीता ऊर्वरीत ऊस बिल प्रति मे.टन रक्कम रु.100/- प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकरी सभासद यांचे बँक खातेवर वर्ग केले आहे. ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना या सिझनमध्ये रक्कम रु.2,900/- व अनुदानासह रक्कम रु.3,000/- इतकी प्रती मे.टन मिळाली असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम 2025-2026 चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे पुर्ण झालेली आहेत. शेती विभागामार्फत अपेक्षीत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार झाले आहेत. या हंगामामध्ये 10 लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवले असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक - रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक- सयाजीराजे मोहिते-पाटील, पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages