अकलूज येथे वीरशैव लिंगायत महिलांचा गरबा व दांडिया स्पर्धा २०२५ संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजीत वीरशैव लिंगायत महिला गरबा दांडिया स्पर्धा २०२५ पाटीदार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या कार्यक्रमाची सुरवात कु.स्पृहा टोंगळे व स्वरा टोंगळे यांनी गणेश वंदना करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.त्यानंतर दुर्गामाता व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन परीक्षक सौ.वैष्णवी खरटमल वीरशैव लिंगायत समाज महिला अध्यक्ष सौ.राजश्री गुळवे,उपाध्यक्ष सौ.सोनाली शेटे व महात्मा बसवेश्वर संस्थेचे महिला अध्यक्ष सौ.पूनम गुळवे,उपाध्यक्ष सौ.प्राजक्ता जठार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
लहान गटामध्ये चि.श्रीराज गुळवे (प्रथम क्रमांक),कु.सोनिया गुळवे (व्दितीय क्रमांक),कु.आरोही ढवळसकर (तृतीय क्रमांक) यांना मिळाला.मोठ्या गटामध्ये सौ.विद्या शेटे (प्रथम क्रमांक),सौ.तेजश्री कथले (व्दितीय क्रमांक) तर सौ. सारिका गुळवे (तृतीय क्रमांक) यांना मिळाला.तसेच,बेस्ट गरबा सौ. विजयालक्ष्मी गुळवे,बेस्ट ड्रेसिंग कु. श्रेया शेटे,बेस्ट एक्सप्रेशन कु.श्रेया गुळवे,बेस्ट एनर्जी सौ.शीला जठार यांना मिळाला.
या कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाजातील महादेव मंदिर पुजारी स्वामी तसेच गुळवे, नरुळे, नष्टे,शेटे,जठार,आर्वे,कथले,पा टील,कुरूडकर,बावधनकर,वैद्य,धोत् रे, बामणकर,कोरे,बन्ने,उंबरदंड,भिं गे, दिवटे,ढवळसकर,चौधरी,कनाळ, टोंगळे,देशमुख,राजमाने,नलवार, दळवी या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व पुरुष- महिला सदस्य यांनी कार्यक्रमाचे नेटके व छान आयोजन केले होते.कार्यक्रमाची सांगता व आभार महिला सदस्यांनी केली.या कार्यक्रमानंतर चटपटीत फ़ूड,गप्पा गोष्टी व कोजागिरी पौर्णिमा निमित्त चंद्रप्रकाशात मसाला दुध घेवून आनंदसोहळा साजरा केला.
0 Comments