सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर हे आता शंभर टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे व स्पीकरमुक्त झाले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिली.
सोमवारी, पोलीस आयुक्तालयात शहरातील मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्ध मंदिराचे पदाधिकारी ट्रस्टी, शांतता समितीचे सदस्य यांची बैठक पार पडली त्यावेळी पोलीस आयुक्त राज कुमार हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, अश्विनी पाटील, सहायक पोलीस
आयुक्त राजन माने, प्रताप पोमन सुधीर खिरडकर आदी उपस्थित होते पोलीस आयुक्त राज कुमार हे बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले, शहर व परिसरात सर्वधर्मियांची एकूण ८९३ धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये ५१६ मंदिरे २९८ मशिदी, मदरसा तर उर्वरित ७९ मध्ये चनं, बौद्ध मंदिरे आहेत. त्यातील २८९ धार्मिक स्थळांवर भोंगे, स्पीकर होते. त्यामध्ये ७९ मंदिरे, १९२ मशिदी, १० चर्च व ८ बौद्ध मंदिरे यांचा समावेश होता. २८९ पैकी २८५ जणांनी बैठकीच्या आधीच भोंगे व स्पीकर स्वतःहून काढून घेतली आहेत. राहिलेल्या दोन मंदिर व दोन मशिदीवरील चार भोंगे, स्पीकर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूर शहर शंभर टक्के भोंगे, स्पीकर मुक्त झाले आहे. ध्वनी नियंत्रण कायदा आहे. परंतु पोलिसांना कोणावरही जबरदस्ती करण्याची वेळ आली नाही. हे सोलापूरचे चांगले व एक मोठे उदाहरण आहे. एखादी व्यक्ती बोलली तर दुसऱ्या धर्मातील व्यक्तीकडून त्याला विरोध होतो. परंतु आजच्या बैठकीत तर एकाने बोलले तर दुसऱ्याने त्याला समर्थन दिले आहे, असा परस्परामध्ये समजूतदारपणा असण्याची
आवश्यकता आहे.
या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केली. यावेळी मोहम्मद शफी अहमद काझी, हसीब नदाफ, मौलाना ताहीर बेग जिलाई जमाम मौलाना इब्राहिम काश्मी जुहूरकर, शकील मौलवी, माजी महापौर आरिफ शेख, मतीन बागवान, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, माजी नगरसेवक बाबा मित्री, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, राजशेखर हिरेहब्बू, अब्दुल्ला डोणगावकर आदी उपस्थित होते.
चौकट
शहरातील वाहतुकीबाबत राबविणार विशेष मोहीम
डॉल्बी, धार्मिक स्थळांवरील भोंगे यानंतर येणाऱ्या काळात शहरातील वाहतुकीबाबत एक विशेष मोहीम पोलीस उपायुक्त गौहर हसन हे राबविणार आहेत. वाढत्या अपघातांमध्ये नागरिकांचे जीव जातात. याबाबत तरुण पिढीला वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन
करण्यात येणार आहे.
सर्वधर्मीय एकदिलाने राहू
शहरात मिरवणुका सर्वात जास्त निघतात. तेथे आवाज बंद करण्यास लावणे हे खूप प्रशंसनीय कार्य आहे. जिल्हा परिषदेसमोर मोठा आवाज असतो. सर्वत्र आवाजाचे नियंत्रण करावे. सर्व मशिदीवरील
भोंगे काढू. पोलिसांना सहकार्य करू. सर्वधर्मीय लोकांना याची माहिती द्यावी, त्याचे ते पालन करतील. सर्व धर्मीय एकदिलाने राहू, मुफ्ती अमजद अली काझी, शहर काझी
0 Comments