जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पूरग्रस्त केवड व वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेट; शेतकऱ्यांना दिला धीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 4, 2025

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पूरग्रस्त केवड व वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेट; शेतकऱ्यांना दिला धीर

 जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पूरग्रस्त केवड व वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेटशेतकऱ्यांना दिला धीर


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असूनपुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. व  ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

          शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आलीअनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आलेअसे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसानजनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असतानागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळगहूजेवण तसेच जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले कीशेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹10,000 मदत रक्कम जमा केली आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगममाढा उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री आव्हाडतहसीलदार  संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages