Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोज जरांगे यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन

 मनोज जरांगे यांनी केले जाधव कुटुंबियांचे सांत्वन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी संघर्षाची हाक देणाऱ्या मनोज जरांगे -पाटील बुधवारी  ज्येष्ठ मराठा समन्वयक आणि महापालिका परिवहन समितीचे माजी  सभापती राजन जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले.
 जाधव यांच्या मातोश्री सगुणाबाई जाधव यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी जरांगे पाटील हे उपस्थित राहू शकले नव्हते मात्र बुधवारी सोलापूर दौऱ्यात त्यांनी धरमशी लाईन येथील जाधव यांच्या घरी  भेट देऊन.
सगुणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.यावेळी त्यांनी जाधव कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.या प्रसंगी अमोल शिंदे, माऊली पवार, शेखर जाधव, विक्रांत जाधव, अक्षय जाधव, श्रीधर काळे, सचिन साळुंखे यांच्यासह जाधव कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments