मंत्री भरत शेठ गोगावले व मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रोजगार हमी पणन फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नुकतेच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना भवन येथे राजकुमार हिवरकर पाटील यांची सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी पदी निवड झाल्याने नव्याने निर्माण केलेल्या कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण केले.यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शुभेच्छा देऊन हे कार्यालयातून उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना अभिप्रेत असे कामकाज इथून घडावं अशी इच्छा व्यक्त केली. शेतकरी, कामगार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारच्या सर्व सुविधा त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी,यावेळी माजी आ.राम सातपुते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, राष्ट्रवादीचे रियाज शेख, भाजपचे मनोज जाधव, भाजपाचे तेजस गोरे, सुनील बनकर, विनोद रणदिवे, बादल सोरटे आदी उपस्थित होते.
0 Comments