Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

 राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता




मुंबई (कटूसत्य वृत्त):- गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनः सुरुवात केली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रापासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पसरलेला वारा व दबावपट्टा आणि तामिळनाडू किनाऱ्याजवळील चक्राकार वारा या दोन्ही गोष्टी राज्यातील हवामानाला पूरक हवा पुरवणार असल्याने मोसमी पावसाळा दमदार सुरुवात होणार आहे.

मुसळधार पाऊस कोठे होणार?

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी वीज आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हलक्या पावसामुळे काही प्रमाणात थंडावा जाणवेल, पण कोकणाप्रमाणे इतर प्रदेशात उकाड्यामुळे तापमान अजूनही वाढलेलं आहे काही ठिकाणी तापमान ३५°C पर्यंत पोहोचलेल्या नोंदी आहेत. हलक्यापावसाने वातावरणात बदल अपेक्षित आहेत.

प्रशासनाने दिल्या सूचना -

नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. कोकण किनाऱ्यावर वाऱ्यांमुळे मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे. विजांसह पावसानंतर झाडांच्या खाली थांबणे पूर्णपणे टाळावे. घराबाहेर निघण्याच्या आधी पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा.

हा पाऊस दुष्काळग्रस्त भागातील धरणे भरायला मदत करणार आहे. तसेच शेतीसाठीही उपयुक्त ठरेल. मात्र, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाऊस आवश्यक असून पिकांना उभारी मिळणार आहे. शेतातील पिकांना आता पाऊस पडला तरच त्यांना फायदा होईल, असं शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments