तिरंगा महोत्सव, रॅलीसह विविध उपक्रम होणार
महापालिकेची राष्ट्रभक्तीपर जागृती मोहीम
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार 'हर घर तिरंगा २०२५' ही राष्ट्रभक्तीपर जनजागृती मोहीम सोलापूर महापालिकेच्या वतीने २ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत तिरंगा महोत्सव, तिरंगा बाईक, सायकल रॅलीसह विविध उपक्रम होणार आहेत.
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेसाठी विशेष नियोजनाची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी 'हर घर तिरंगा' उपक्रम शहरातील नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीचा अभिमान व्यक्त करावा. आपली तिरंगा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र मिळवावे आणि सोशल मीडियावर हॅशटॅगसह
शेअर करावा. डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त, महापालिका
राबविण्याबाबत माहिती दिली. उपायुक्त तैमूर मुलाणी, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मनीषा मगर, तपन डंके, सतीश एकबोटे, राजेश परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.
तिरंगा महोत्सव, मेळ्याचे आयोजन
देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणांसह सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, तिरंगा यात्रा, प्रमुख चौक, उद्याने व बाजारपेठांमध्ये तिरंगा सजावट घरोघरी तिरंगा वितरणासाठी बचतगट व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, तिरंगा कॅनव्हास व तिरंगा प्रतिज्ञा कार्यक्रम घेतले जाणार आहेत. १३ ते १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घर, कार्यालय, वाहन यावर राष्ट्रध्वज फडकावणे, १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभ, सेल्फी व प्रतिज्ञा अपलोड, मीडियाद्वारे उपक्रमांचे प्रसारण, नागरी भागांतील प्रमुख इमारती व ठिकाणी तिरंगा प्रकाशयोजना, तिरंगा विक्री विविध ठिकाणी तिरंगा रांगोळी, कॅनव्हास व सेल्फी पॉईंट्स उभारणी करण्यात येणार आहे.
0 Comments