डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालक दगावल्याचा
सोलापूर :(कटूसत्य वृत्त):- भागवत थिएटरजवळील चिरायू हॉस्पिटलमध्ये बालक दगावल्याप्रकरणी हॉस्पिटलवर कारवाई अटळ आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालक दगावल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत का, हा तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्याने हे प्रकरण जिल्हा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने बोगस डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील चाललेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात मोहीम उघडली आहे. चिरायू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालक दगावण्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती.. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवार (दि. ५) ऑगस्ट रोजी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली होती. या प्रकरणात तक्रारदार आणि डॉक्टर यांना आमने सामने करण्यात आले. तक्रारीमध्ये तथ्य आढळले आहे. बालक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र बालकास अॅडमिट करायचे की नाही यावरून हॉस्पिटल प्रशासन आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात संभ्रम असल्याने बालकास अॅडमिट करण्यास वेळ लागला. त्यामुळे चार वाजता बालकाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
दामा हॉस्पिटलबाबत तक्रार
पुणे नाका परिसरात असलेल्या दामा हॉस्पिटलच्या संदर्भातदेखील तक्रारी
प्राप्त झाल्याने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी एक
पथक पाठवून हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे जप्त करून ताब्यात घेतली आहेत.
या संदर्भात कारवाईकडे लक्ष लागले आहे.
0 Comments