Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.प)चे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्यातर्फे साडेतीन टन खिचडी वाटप

 राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.प)चे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्यातर्फे साडेतीन टन खिचडी वाटप 



नाना-भैय्या युवा मंचाचे परिश्रम 

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त):- आषाढी एकादशीनिमित्त  दरवर्षीप्रमाणेच या वर्षी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख वतीने करमाळा बायपास,टेंभुर्णी येथे साडेतीन टन खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी नाना-भैय्या युवा मंचाचे योगदान लाभले. तालुक्याचे युवक नेतृत्व रावसाहेब नाना देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असणाऱ्या सर्व भाविक-भक्तांना खिचडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
     यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख म्हणाले की,श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी जाणाऱ्या वारकऱ्यांना दरवर्षी मोफत खिचडी वाटप करण्यात येते. "वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा' हे ब्रीद पाळून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे. यावर्षी प्रत्येक जिल्ह्य़ात पेरणीच्या वेळीच पाऊस पडल्यामुळे वारीतील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. परतीच्या मार्गावरील एकही वारकरी उपाशीपोटी घरी जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. या खिचडी वाटपासाठी सर्वांचाचे सहकार्य लाभते. टेंभुर्णीसह परिसरात लोक स्वतःहून येथे विठ्ठल सेवा करण्यासाठी येत असतात. टेंभुर्णी येथील टेंभुर्णी-करमाळा ब्रिज जवळ सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खिचडी वाटप करण्यात आली.
.खिचडी वाटप सोहळ्याची सुरुवात मा. अंबादास चंदनशिवे साहेब, उपसचिव, कृषी व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पूजन व आरती करुन झाली. खिचडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाकार्याध्यक्ष रविंद्र पाटील,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपूरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड.बाळासाहेब पाटील, उद्योजक बाळासाहेब ढेकणे,डाॅ.धनाजी खताळ,नारायण भानवसे सर, जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बापू महाडिक,ॲड.संतोष कानडे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक, सामाजिक कार्यकर्ते गोरख बाप्पा देशमुख, बाळासाहेब बारवे, संदीप हवलदार, शैलेश ओहोळ ,सोमनाथ  कदम, सुरेश देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात, पत्रकार सोपान ढगे, सतीश चांदगुडे, संतोष वाघमारे, धनंजय मोरे, गणेश पोळ, पिंटू सुरवसे,अटकळे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सचिन खुळे,
संदीप मोकाशी,दिपक व्यवहारे,किशोर नवले,गणेश हांडे,दिपक खोचरे,राम पवार शंकर सुरवसे,समाधान अनपट,केशव गायकवाड, चव्हाणवाडी चे माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण, चव्हाणवाडी चे माजी सरपंच नवनाथ शिंदे ॲड.सचिन चव्हाण,आझाद फाउंडेशनचे सर्व सदस्य यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित दर्शली. या खिचडी वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना-भैय्या युवा मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments