Hot Posts

6/recent/ticker-posts

राजराजेेश्वरी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी दिंडी

 राजराजेेश्वरी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी दिंडी



सोलापूर  (कटुसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी दिंडी  उत्साहात काढण्यात आली. 
प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार व माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक  शिवानंद मेणसंगी  यांच्या हस्ते  विठ्ठल रखुमाईंच्या प्रतिमांचे पूजन व विठ्ठल रखुमांईच्या वेशभूषा परिधान केलेल्या बाळ गोपाळांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या हरिनामाच्या जयघोषात शाळेच्या परिसर दुमदुमून गेला.दिंडीतून विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता , साक्षरता, पर्यावरण रक्षण व मतदानाचा अधिकार याविषयी घोषणा देऊन संदेश दिला.पर्यावरण की रक्षा देश की सुरक्षा या विषयावर पथनाट्य,झाडे लावा झाडे जगवा या विषयावर मूकनाट्य तर रखुमाई रखुमाई या गीतावर समुह नृत्य सादर केले.विद्यार्थी  वारकरी वेशभूषा केले होते.भगवा झेंडे धारी विद्यार्थी विठ्ठल नामाचा जयघोष करीत दिंडी यशस्वी केली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका फुगडी खेळल्या .कार्यक्रमाचा शेवट प्रसाद वाटपांनी झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments