Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.अंबारे यांचे दक्षिण कोरियाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग

 डॉ.अंबारे यांचे दक्षिण कोरियाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग


 _सुपरकॅपॅसिटरवर संशोधन सादर_ 
सोलापूर  (कटुसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावचे डॉ. रेवणप्पा चंद्रकांत अंबारे हे दक्षिण कोरियामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सुपरकॅपॅसिटरवर संशोधन सादर केले. 
सध्या डॉ. रेवणप्पा अंबारे हे खोपोली (रायगड) येथील के.एम.सी.महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते अलीकडेच दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत  सहभाग घेऊन उर्जा साठवणुकीच्या अत्याधुनिक क्षेत्रामधील सुपरकॅपॅसिटर या विषयावर संशोधन सादर केले. हे परिषद दक्षिण कोरियामधील सुक्युनक्वान विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आला होता. 'प्रगत सामग्री सिंथेसिस, वर्णन आणि अनुप्रयोग' या विषयावर प्रभावीपणे संशोधन सादर केले. सध्या भारतात ऊर्जा संचयन करण्याची काळाची गरज आहे हे ओळखून प्रा. अंबारे यांनी सुपरकॅपेसिटर या संकल्पनेवर संशोधन करत आहेत .या परिषदेसाठी त्यांचा पीएचडी विद्यार्थी ऋषीकेश बोबडे व सोलापूर विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाचे प्रा.डॉ. बी. जे. लोखंडे सहभाग घेतले. या संशोधन कार्यासाठी प्रा.अंबारे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments