Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महामृत्युंजय महाअभिषेक

टेंभुर्णीत बबनदादावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महामृत्युंजय महाअभिषेक


विजयदादा खटके व बंडूनाना ढवळे यांचेकडून 50 हजार वारकऱ्यांना फराळाचे वाटप

टेंभुर्णी  (कटुसत्य वृत्त):- संयोजक विजयदादा खटके व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे यांचे वतीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले.सुमारे 50 हजार वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. पंढरपूरच्या मार्गावर असणाऱ्या सर्व विठ्ठलभक्त वारकऱ्यांसाठी ही सोय करण्यात आली होती. मागील 5 वर्षापासून प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे पंढरपूरकडे जात असताना बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांची सोय होते परंतु परतीच्या मार्गावर ही विठ्ठल भक्तांची फराळाची सोय होणे गरजेचे आहे.या उद्देशाने हा विधायक व रचनात्मक उपक्रम चालू केलेला आहे.यामध्ये दोन टन साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनरावजी शिंदे हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अमेरिका येथे गेले आहेत त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी महामृत्युंजय महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील 5 दाम्पत्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची पुजा करुन महाभिषेक केला.यावेळी माढा तालुक्यातील आदरणीय दादांवर प्रेम करणारे नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोबाईल वरून व्हिडिओ कॉलद्वारे आदरणीय बबनदादांनी ही सर्वांशी संवाद साधला.यावेळी सर्व कार्यकर्ते भावनिक झाले होते.दादांनी महाअभिषेका साठी बसलेल्या दांपत्यांचे आभार मानले व सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे यांनी केले.

यावेळी दिलीपराव भोसले, शिवाजीराव पाटील-चांदजकर, शंभुराजे मोरे,सचिन होदाडे, गणेश काशीद,गोरख देशमुख व उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे यांनी मनोगतातून बबनदादांच्या उत्तम आरोग्याची कामना व्यक्त करीत पांडुरंगाकडे साकडे घातले.

यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ उबाळे,माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे,जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे,शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा खटके , जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील,माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत,संचालक गणेश काशीद,डॉ.गोरख देशमुख,मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, आप्पासाहेब उबाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,सज्जनराव जाधव,सरपंच तानाजी लांडगे,प्रदिप चौगुले, कैलास तोडकरी,विठ्ठल मुकणे, कारखान्याचे संचालक निलकंठ पाटील,संदीप पाटील,रमेश येवले पाटील,वेताळ जाधव, विष्णू हुंबे,लक्ष्मण खुपसे, रमाकांत कुलकर्णी,अशोक मिस्कीन,श्रीकांत कोरे, दत्तात्रय देवकर,तांबवेचे तंटामुक्ती अध्यक्ष नागाभाऊ खटके,मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके,रामभाऊ शिंदे,सर्जेराव बागल,श्रीकांत लोंढे,लक्ष्मण शिंदे,मार्केट कमिटी संचालक शिवाजीराव पाटील,दादासाहेब देशमुख, चव्हाणवाडी चे माजी सरपंच नवनाथ शिंदे, अर्जुन सलगर, चव्हाणवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे, संजय मिस्किन, टाकळी चे सरपंच तानाजी सलगर, शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण, सौदागर नांगरे,सचिन तळेकर, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, विनायक चौगुले,अमोल देवकर मार्केट कमिटीचे सदस्य  रामभाऊ वाघमारे,धनंजय मोरे तसेच आवर्जून टेंभुर्णी शहरातील पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार सदाशिव पवार, सोपान ढगे,सतीश चांदगुडे,गणेश पोळ, संतोष वाघमारे , पिंटू सुरवसे,यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य माढेश्वरी बँकेचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक,सोसायटीचे चेअरमन व संचालक यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी या कार्यक्रमाचे आभार नागेश खटके यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले 

Reactions

Post a Comment

0 Comments