वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 1, 2025

वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय

 वारकरी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी चार्जिंगची सोय


झेडपीची यंत्रणा: पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मानाच्या पालख्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या कुटुंबाची ख्याली- खुशाली विचारण्यासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून मोबाईलला चार्जिंग करता यावे म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून  पंढरीच्या दारी वारकरी मोबाईल चार्जिंग करी यासाठी  5 ऊर्जा वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

संतांच्या पालख्यांबरोबर अनेक वारकरी दुरून काही चालत येत असतात बरेच दिवस ते कुटुंबापासून दूर असतात दिवसभर चालून थकल्यावर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याला आल्यावर कुटुंबांशी त्यांचा संपर्क सुरू असतो. अशात मोबाईलला चार्जिंगची व्यवस्था न झाल्यास त्यांचा संपर्क तुटतो. वारकऱ्यांना ही समस्या भेडसावून नाही म्हणून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पालखी मार्गावर 5 ऊर्जा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनावर एकाच वेळी 100 मोबाईल चार्जिंग करता येणार आहेत. तसेच या वाहनावर असलेल्या डिस्प्ले द्वारे शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. ऊर्जा वाहन  पालखी सोहळ्या बरोबर पुढे सरकणार आहेत. विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी या वाहनांचे अविरत सेवा राहणार आहे यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत विभागावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी पालखी महाआरगावरील सर्व सुविधा अमलात आणण्यासाठी कार्यरत राहणार आहेत पालखी मार्गावर वळणाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत या फलकावर पालखी तळ हिरकणी कक्ष पिण्याचे पाणी गावचा नकाशा वारकरी सुविधा केंद्र आरोग्य केंद्र कचरा संकलन शौचालय व स्नानगृहाची माहिती देण्यात आली आहे.

कचरा संकलन...
पालखी सोहळ्या बरोबरचे वारकरी व दिंडोप्रमुखांना कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देण्यात येणार आहेत याद्वारे कचरा संकलित करण्यात येणार आहे तसेच ठीक ठिकाणी कचरा कुंड्या उभारण्यात येणार असून ग्रामपंचायतीच्या घंट्या गाड्या मार्फत ग्रीन शेडमध्ये हा कचरा संकलित करून विल्हेवाट लावले जाणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी राबणारे कर्मचारी व स्वयंसेवकांना पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी रेनकोट देण्यात येणार आहेत तीन पाळीमध्ये हे कर्मचारी काम करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages