फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे दिलीप माने यांची हजेरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 8, 2025

फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे दिलीप माने यांची हजेरी

 फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे दिलीप माने यांची हजेरी



  राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतला हजेरी लावली आहे.

त्यांच्या या उपस्थितीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दिलीप मानेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने हे देखील मुखमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते.

अलीकडेच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप मानेंनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम आटपून परत निघताना सोलापूर विमानतळवर दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीमुळे राजकिय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दिलीप माने यांची निवड

नुकतंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला होता. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल करण्यात आला होता. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. यात भाजपला फुल्ल सपोर्ट देत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते दिलीप माने यांची निवड झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages