Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर ग्रामीण पोलीस कार्यालाकडून राष्ट्रीय पेन्शस योजना मधील मयताचे वारसांना रक्कम अदा

 सोलापूर ग्रामीण पोलीस कार्यालाकडून राष्ट्रीय पेन्शस योजना मधील मयताचे वारसांना रक्कम अदा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासनाचे पेन्शस संदर्भातील नॅशनल पेन्शस योजना ही दिनांक ०१/११/२००५ रोजी नंतर शासकीय सेवेमध्ये दाखल होणारे नोकरांसाठी लागू केली आहे. त्यामध्ये दिनांक ०१/११/२००५ रोजी नंतर शासकीय नोकरीमध्ये दाखल होणारे सरकारी नोकरांसाठी त्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम ही अंशदान म्हणून जमा करण्यात येते. परंतू सदर सरकारी नोकर हा सेवेदरम्यान मयत झाल्यास त्यांना जमा झालेली अंशदानाची रक्कम ही वारसांना तात्काळ अदा करण्यात येते.
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण आस्थापनेवर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले १) नानासाहेब पांडूरंग नकाते व २) सोमनाथ हरीभाऊ कोळी हे त्यांच्या सेवेमध्ये असताना तात्कालीन कारणावरून मयत झाले आहेत. त्यांनी सेवेत असताना त्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम ही अंशदान म्हणून कपात झाली होती. सदरची कपात झालेली पूर्ण रक्कम आज रोजी धनादेशाद्वारे अदा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये १) नानासाहेब पांडूरंग नकाते यांचे वारसदार त्यांच्या पत्नी संगिता नानासाहेब नकाते यांना ७,०२,२३४/- रूपये व २) सोमनाथ हरीभाऊ कोळी यांचे वारसदार त्यांच्या पत्नी पूजा सोमनाथ कोळी यांना ११,५३,४५९/- रूपये धनादेशाद्वारे अदा करण्यात आली आहे. संबंधीत दिवगंत पोलीस अंमलदार यांच्या कुटूबींयाना "फॅमिली पेन्शस" मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर वेळी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर गामीण, बाबासाहेब धर्मे, कार्यालयीन अधीक्षक यशवंत बुलुंगे व राहूल घाटगे, वरीष्ठ लिपीक पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण तसेच मयत पोलीस अंमलदार यांचे नातेवाईक हजर होते.
Reactions

Post a Comment

0 Comments