Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शंकरलिंग प्रशालेत माजी विद्यार्थी तर्फे वही वाटप कार्यक्रम

 श्री शंकरलिंग प्रशालेत माजी विद्यार्थी तर्फे वही वाटप कार्यक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वळसंग (ता.द.सोलापूर) येथील श्री शंकरलिंग प्रशालेत माजी विद्यार्थी विकास भीमराव जाधव तर्फे प्रशालेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव विश्वनाथ थळंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे,त्यांचे सुपूञ प्रथमेश इंगळे,वळसंग पोलिस स्टेशनचे एपीआय अनिल सनगले,श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीशैल दुधगी,चेअरमन शिवशरण थळंगे, सदस्य प्रकाश दुधगी, रमेश दुधगी, कल्लय्या स्वामी,विकास जाधवचे कुटुंबीय जयश्री जाधव व शैक्षणिक वर्ष २००४-०५ या बॅचचे त्याचे वर्गमित्र उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी शाब्दिक तर प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीतानी केले.तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे महेश इंगळे यांचा परिचय अचलेरे यांनी  तर विकास जाधव यांचा परिचय तानाजी जमादार यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वीरेश थळंगे यांनी केले. प्रशालेतर्फे प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देऊन तर विकास जाधव यास कृतज्ञता पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात प्रशालेतील गरजू व होतकरू अशा इयत्ता पाचवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांना २५५० वह्यांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महेश इंगळे, एपीआय अनिल सनगले,अनिल बर्वे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व विशद करून विकास जाधवच्या दातृत्व गुणाचे कौतुक केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ थळंगे यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जीवनात उत्तम शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे व विकास जाधव प्रमाणे आपले दातृत्व गुण सिध्द करून दाखवावे असे आवाहन केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्दाराम भैरामडगी,बाळकृष्ण गुंड, निलकंठ कवटगी,सिध्दारुढ हिरेमठ,बसवराज दुधगी, विरेश थळंगे,संतोष कस्तुरे,विजय प्याटी, अजय माणकोजी, विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे, सेवक कट्टेप्पा कोळी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत भोसले यांनी तर आभार प्रदर्शन गंगाधर बिराजदार यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments