"एक पेड मां के नाम" अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-"एक पेड मां के नाम " ही व्यापक वृक्षारोपण मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रारंभ करण्यात आली असून, ही मोहीम भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत "मेरा युवा भारत" या संस्थेमार्फत राबवली जात आहे. या अभियानाअंतर्गत मेरा युवा भारत, सोलापूर अंतर्गत संचालित व्यसनमुक्ती मानसोपचार केंद्रात दिनांक १६ जुलै २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमास मेरा युवा भारत सोलापूरचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, लेखा अधिकारी भानुदास यादव, प्रकल्प संचालक अनिल हिंगे, व व्यसनमुक्ती केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते., तसेच शेंडगे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज, उमरगा (जि. धाराशिव) येथील विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होता. यावीवेळी जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे म्हणाले कि, आपण सर्वांनी पर्यावरण संवक्षणसाठी पुढे यावे, आणि लावलेले रोपांची मोठी होईपर्यंत काळजी घ्यावी. त्यांनी सागितले कि, एक पेड मां के नाम" अभियानांतर्गत युवा मंडळ माधमातून रोपे लावली जात आहेत., आणि त्यांच्या काळजीची जबाबदारी देण्यात येत आहे. या कार्यक्रम' अंतर्गत केंद्राच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप प्रदान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
0 Comments