केंद्रीय पथका कडून जलजीवन मिशन च्या बीबीदारफळ मधील कामांची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 17, 2025

केंद्रीय पथका कडून जलजीवन मिशन च्या बीबीदारफळ मधील कामांची पाहणी

 केंद्रीय पथका कडून जलजीवन मिशन च्या बीबीदारफळ मधील कामांची पाहणी





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात जलजीवन मिशन च्या कामांना गती द्या. लोकांना योजनेचा लाभ मिळू द्या. कामांचे दर्जावर लक्ष ठेवा. पाणी गुणवत्ता सांभाळा. गाव स्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा असे आवाहन केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाळ शेठी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौरावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी आज जिल्हा परिषदेच भेट देऊन जिल्ह्यातील जल जीवन मिशन च्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बीबीदारफळ ग्रामपंचायतीस भेट दिली. या प्रसंगी याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,  उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड,  उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक लेखा बापू शेंडगे यांच्यासह उप अभियंता  योगीराज बेंबळगी, नाबार्ड चे महेश शिरपूर, पी. एच कुलकर्णी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, शाखा अभियंता जयवंत जाधव,  यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी स्वागत प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी करून सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामांची माहिती दिली. निधी अभावी अनेक कामांचे प्रगती वर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व जलजीवन मिशन च्या कामांची परिपूर्ण माहिती देऊन फोटो सह सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शनाखाली योजना पुर्णात्वास नेत असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.
बिबीदारफल ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच अर्चना विठ्ठल ननवरे , उप सरपंच नारायण सर्वगोड उपस्थित होते. गावातील पाण्याची विहीर व पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली. बीबीदारफळ तलावातून अकोलेकाटी ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणारे योजनेची पाहणी शिष्यपाल शेठी यांनी केली.

दीड किलो मिटर पायी चालून केली पाहणी…!
………..
केंद्र शासनाचे वाॅश सल्लागार शिष्यपाल सेठी यांनी दीड किलोमीटर पायी चालत योजनेची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात महिला कडून पाणी नमुने तपासून घेतले.  पाणी पुरवठा योजनेची नळ कनेक्शन ची पाहणी केली. पाणी सोडायला सांगून पाण्याचा दाब विचारून घेतला. गावातील पाण्याची गरज ओळखून योजना लवकर पुर्ण करा असे सांगून पाईप, टाकीचे बांधकाम, विहिरींचे बांधकाम पाहिले. विहिरीची पाणी पातळी पाहून सुखावून गेले. दीड किमी अंतर पायी चालत तलावातील विहीर व पाईप लाईन ची चारी जेसीबीने खोदून पाहणी केली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सर्व कामांची परिपूर्ण माहिती दिली. उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी इंग्रजी व हिंदीतून सोलापूर जिल्हा दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत वारंवार बदलत असल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बीआरसी मोनिका दिनकर, आम्रपाली. गजघाटेांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली. पाणी गुणवत्तेची माहिती सोनाली कुलकर्णी यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages