आयोजक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अकलूज यांनी मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्या प्रस्तावित व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द केला आहे. समाजात तेढ, द्वेष आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या विचारांना पुरोगामी विचारांच्या भूमीत स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
भविष्यातही अशा वादग्रस्त आणि समाजात फूट पाडणाऱ्या कार्यक्रमांना लोकशाही व संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कायम संघर्ष करत राहतील.
हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा, समविचारी संघटनांचा आणि संविधानवादी विचारांचा आहे. विरोधासाठी निवेदने देणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या सर्व समविचारी संघटना /कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विशेषतः बंडखोर नेते.गौतम भंडारे साहेबांनी सुरुवातीपासून ठाम भूमिका घेत आवाज उठवला आणि त्यानंतर शेकडो कार्यकर्ते या लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा लोकशाही विजय शक्य झाला.
यापुढेही अन्याय, द्वेष आणि संविधानविरोधी विचारांना संविधानिक मार्गानेच उत्तर देत राहू. संघर्ष सुरूच राहील.
आयु.अविनाश भैय्या सोनवणे.
{सामाजिक कार्यकर्ता}
जय भिम ! 💙
जय संविधान! 📖🇮🇳

No comments:
Post a Comment