स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


पुणे, (कटूसत्य वृत्त):- केंद्र शासनामार्फत स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येत असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी सहाय्य योजना राबविण्यात येत आहे.


या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या लाभासाठी प्रकल्प खर्चाच्या १० टक्के स्वहिस्स्याचा भरणा केल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर, उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एंड सबसिडी (मार्जिन मनी) स्वरुपात राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages