आरोग्य विद्यापीठाचे आंतरविद्यापीठ महिला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील सांस्कृतिक विभागात सर्वसाधारण विजेतेपद
महिलांचा नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास दृढ होणे गरजेचे
नाशिक: (कटूसत्य वृत्त):- - समाजातील माहिलांचा नेतृत्वगुण व आत्मविश्वास अधिक दृढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. सोलापूर येथे आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या महिला संघाने सांस्कृतिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतपद पटकावले आहे. या महिला संघाचा मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, महिला कर्मचायांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास अधिक दृढ होणे गरजेचे आहे. कार्यालयीन आणि कौटुंबिक जबाबदाÚया सांभाळत महिलांनी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र येण्याची व परस्पर संवाद आणि स्नेहभाव वाढण्याची सुवर्णसंधी मिळाली. क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील क्षमता प्रदर्शित करण्यासाठी महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
ते पुढे म्हणाले की, आपले क्रीडांगणावरील कौशल्य आणि सांस्कृतिक मंचावरील कलात्मकता प्रत्येकाला प्रेरणादायाी ठरेल. आपण केवळ करंडक जिंकून आणला नाही तर इतर विद्यापीठांतील भगिनींची मनेही जिंकली आहेत. सर्व सहभागींचे मी कौतुक करतो विद्यापीठ प्रशासन नेहमीच खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे आणि भविष्यातही अशा उपक्रमांना आपण असेच प्रोत्साहन देऊ असे त्यांनी संागितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सोलापूर येथे आयोजित आंतरविद्यापीठ महिला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विद्यापीठाच्या महिला संघाने सांस्कृतिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य
समूह गायन आणि समूह नृत्य आदी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. गायकांनी केलेले सुमधुर स्वरात गीतांचे सादरीकरण, नृत्य स्पर्धेत पारंपरिक तसेच आधुनिक नृत्यशैली व क्रीडा स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरी केली आहे
या स्पर्धेत वैयक्तिक गायन स्पर्धेत चेतना पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकल नृत्य स्पर्धेत श्रीमती सुवर्णा खैरनार यांनी द्वितीय क्रमांक व एकल गायन स्पर्धेत अमृता खार्डेकर यांनी द्वितीय क्रमांक, रांगोळी स्पर्धेत श्रीमती ज्योती इटणकर तृतीय क्रमांक, रोड रेस स्पर्धेत चंद्रकला बाचकर यांनी उत्तेजनार्थ पारितोशिक पटकावले आहे.
समुह गीत गायन स्पर्धेत विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला असून श्रीमती चेतना पवार, अमृता खार्डेकर, वीणा इंगळे, शितल कदम, रचना काटकर, पल्लवी उके यांनी सहभाग घेतला होता.
समुह नृत्य स्पर्धेत विद्यापीठाने तृतीय क्रमांक पटकाविला असून समुह नृत्यात सुवर्णा खैरनार, मोनाली जगताप, प्रणाली खिरोडे, पल्लवी शुक्ला, पल्लवी उके, अश्विनी देशमुख, वीणा इंगळे, चंद्रकला बाचकर, अमृता खार्डेकर महिला कर्मचारीचा सहभाग होता.
विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी तसेच उपस्थितांचे आभार श्रीमती सुवर्णा खैरनार यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment