सुशील बंदपट्टे यांची कार्याध्यक्षपदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 26, 2025

सुशील बंदपट्टे यांची कार्याध्यक्षपदी निवड

 सुशील बंदपट्टे यांची कार्याध्यक्षपदी निवड
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या
शिफारसीनुसार, खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून काम केले आहे. चंद्रनील फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप, गोरगरीब लोकांना धान्य वाटप केले आहे. तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या एका युवा कार्यकर्त्याला कार्याध्यक्षपदाची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही आपण पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून, तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेसचे काम पोहचवणार असल्याचे बंदपट्टे यांनी
सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages