Hot Posts

6/recent/ticker-posts

२४१ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा होणार वीजपुरवठा

 २४१ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा होणार वीजपुरवठा

सोलापूर जिल्ह्यात १६८८ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जेची कामे सुरू

सोलापूर(कटुसत्य वृत्त):-  शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. सोलापूर जिल्ह्यात १६८८ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित

सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून २४२ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

सध्या २७९ मेगावॉट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. सोलापूर येथील नियोजन भवनात मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक सचिन

तालेवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प), प्रसाद रेशमे व धनंजय औंढेकर (पायाभूत आराखडा व विशेष प्रकल्प), सल्लागार श्रीकांत जलतारे, प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील काकडे, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, निवासी जिल्हाधिकारी गणेश निपळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ,

पोलीस निरीक्षक डी. बी. मितडे, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे, सहायक विद्युत निरीक्षक व. नि. सुतार उपस्थित होते.

लोकेश चंद्र म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वांत मोठ्या विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षभरात १६ हजार मेगावॉट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत.

चौकट 

प्रबोधनाद्वारे विरोध दूर करा

सोलापूर जिल्ह्यात २४२ उपकेंद्रांच्या ठिकाणी १ हजार ६८८  मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या ४५ उपकेंद्रांच्या ठिकाणी उपलब्ध ५० जागावंर २७९ मेगावॉट सौर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेचे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्यावे. गैरसमजातून होणारे विरोध प्रबोधनाद्वारे दूर करावे.

लोकसंवाद व सहकार्यांतून या योजनेला गती देण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा, असे आवाहन लोकेश चंद्र यांनी केले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments