पंढरपूर कॉरिडॉरचा नकाशा व मोबदल्याचा प्रस्ताव सादर
भूसंपादन अधिकारी देशमुख यांनी साधला बाधितांशी संवाद
पंढरपूर,(कटुसत्य वृत्त):- पंढरपूर कॉरिडॉरबाबत प्रशासनाकडून संभाव्य बाधितांची शुक्रवारी तीन सत्रात बैठक घेण्यात आली. यामध्ये उपस्थित नागरिकांना कॉरिडॉरचा नकाशा दाखविण्यात आला तसेच बाधितांना २० ते ४० हजार रुपये चौरस फूट याप्रमाणे नुकसान भरपाई मिळू शकते, असा प्रस्ताव देखील मांडण्यात आला.
पंढरपूर कॉरिडॉर करण्याबाबत
प्रशासनाकडून पावले उचलली जात असून याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, २५ पासून संभाव्य बाधितांशी चर्चा करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर अधिकारी २५ ते ३० नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात तीन सत्रांत चर्चा पार पडली. यावेळी भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांनी उपस्थितांशी संवाद साधला. नागरिकांनी कॉरिडॉरबाबत वारंवार चर्चा का केली जात आहे असा प्रश्न केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केवळ विश्वासात घेतले जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, बापितांच्या समिती सदस्यांना भेट दिली जात नाही. अद्याप कॉरिडॉरचा नकाशा देखील दाखविण्यात आला नाही. नुकसान भरपाईविषयी माहिती दिली जात नसल्याने नागरिकांनी बैठकीवर जोरदार आक्षेप घेतला.
काही वृध्द व महिलांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. नागरिकांचा संताप पाहून अखेर देशमुख यांनी कॉरिडॉरचा नकाशा सर्वासमोर सादर केला. यावेळी तो पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
यावेळी उपस्थित अधिकारी संतोष देशमुख यांनी नागरिकांशी संवाद साधत, कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून येथील नागरिकांना किती मोबदला हवा आहे, अपेक्षा काय आहेत यासाठी
0 Comments