भाजपला शिंदेसेनेची डोकेदुखी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

भाजपला शिंदेसेनेची डोकेदुखी

 भाजपला शिंदेसेनेची डोकेदुखी 

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेसेनेत आलबेल नाही, असे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होत आहे. भाजपच्या अडचणीत वाढ कशी होईल, हे शिंदेसेनेकडून आवर्जून बघितले जात असून, त्यादृष्टीने पावले उचलले जात आहे. सोलापूर भाजपची सूत्रे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्याहाती गेली आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेला स्नेह आणि त्याचा प्रशासनावरील परिणाम, बाजार समिती निवडणुकीत यशस्वी झालेली रणनीती पाहता पक्षश्रेष्ठींनी त्यांना बळ देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच कल्याणशेट्टी यांची मतदारसंघातच कोंडी करण्यासाठी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदेसेनेने कट्टर विरोधक काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. म्हेत्रे यांना आता महायुतीत एक भागीदार वाढला आहे. त्यापाठोपाठ दोन महिन्यांपूर्वी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत आलेल्या अमर पाटील यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. पाटील यांनी सुभाष देशमुख यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, हे लक्षात घ्यायला हवे. आता त्यांच्याकडे अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर हे मतदारसंघ राहतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages