म्हेत्रेंच्या पर्यायाचा काँग्रेसकडून शोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

म्हेत्रेंच्या पर्यायाचा काँग्रेसकडून शोध

 म्हेत्रेंच्या पर्यायाचा काँग्रेसकडून शोध

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-काँग्रेस आणि सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत सैनिक असलेल्या सिद्धराम म्हेत्रे यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस पक्षात खळबळ माजणे स्वाभाविक होते. अक्कलकोट हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तेथे खिंडार पडत असेल, तर हे लोण इतर तालुक्यांत पोहोचू शकेल, म्हणूनच खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसजनांची बैठक घेऊन अक्कलकोटचे पालकत्व स्विकारल्याची घोषणा केली. म्हेत्रे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय अक्कलकोटचा निर्णय घेतला जात नव्हता, काँग्रेस सोडण्यापूर्वी म्हेत्रे भेटले आणि सत्ताधाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा गौप्यस्फोट प्रणिती शिंदे यांनी केला. ऊस बिलाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा करून म्हेत्रे यांना यापुढे 'जशास तसे' उत्तर काँग्रेसकडून दिले जाईल, असा इरादा शिंदे यांनी जाहीर केला. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी निर्णय घेतल्यानंतर आता स्वकियांच्या रोषाला म्हेत्रे यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहे. अर्थात म्हेत्रे आणि शिंदे यांच्यासोबत आहे कोण हे ५ जूननंतर स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages