रणजितसिंहांची गुगली; सातपुतेंचा त्रागा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते- पाटील यांची भूमिका जगजाहीर होती. त्यामागील कारणेदेखील उघड आहेत. पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी हा मुद्दा पेटवला आणि श्रेष्ठींपर्यंत लावून धरला. भाजपने मोहिते-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षाचे विधान परिषद सदस्य आणि पक्षीय कार्यकर्ता या नात्याने संघटन पर्वात हजार सदस्य नोंदणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रशंसापत्र पाठवले. कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतर काही दिवसांनी प्रशंसापत्र पक्षश्रेष्ठी पाठवतात, याचा अर्थ राम सातपुते यांनी लक्षात घ्यायला हवा होता. पक्षश्रेष्ठींचा संदेश लक्षात घेऊन रणजितसिंह हे प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांच्यासंदर्भातील प्रश्नाला बावनकुळे यांनी शिस्तपालन समितीकडे बोट दाखवून वेळ मारून नेली, तरीही सातपुते त्रागा करीत राहिले. रणजितसिंहांवर कारवाई होणारच, असा दावा करीत राहिले. आता याला काय म्हणावे?
0 Comments