प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याकडे आमदारांची पाठ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपतील स्थान आता दुसऱ्या क्रमांकाचे आहे. महसूलमंत्रिपद हे वजनदार खाते त्यांच्याकडे आहे, हे पहिले कारण आणि प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, हे दुसरे कारण. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. परंतु, पक्षातील मतभेद आणि मनभेदाची परिसीमा गाठली गेली की काय, अशी शंका यावी, असे चित्र समोर आले. प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीकडे शहरात असूनही ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख फिरकले नाही. शेवटी बावनकुळे यांना वाट वाकडी करून त्यांच्या घरी जावे लागले. दुसरे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि बाजार समिती निवडणुकीतील सूत्रधार आणि पक्षश्रेष्ठींचे लाडके आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बाहेरगावी होते. शिस्त, संघटन या तत्वांना महत्व देणाऱ्या भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षांचा दौरा अचानक ठरत नाही. पूर्वनियोजित दौरा असेल, तर आमदारांना पूर्वसूचना नव्हती का? केवळ दोन आमदारांनी हजेरी लावणे आणि कोअर कमिटीची बैठक गुंडाळली जाणे हे सत्ताधारी पक्षाला शोभादायक नाही.

No comments:
Post a Comment