पावसाळ्यात नियमित शुद्ध पाणीपुरवठा करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

पावसाळ्यात नियमित शुद्ध पाणीपुरवठा करा

 पावसाळ्यात नियमित शुद्ध पाणीपुरवठा करा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  पावसाळ्यात दूषित पाणी वाहून आल्याने, ग्रामीण भागात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.


पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य साथरोगांच्या उद्रेकाबाबत उपाययोजना करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. यामध्ये योग्य पध्दतीने नियमित शुध्दीकरण प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करण्यात

यावा, जलस्त्रोत, जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी पुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल करणे, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंतांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा आढावा घेऊन याबाबत आवश्यक ती उपाययोजना करून त्याचा अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा, असे सांगितले आहे.


चौकट 

असे करावे नियोजन

सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही याची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करणे, डास, माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना करणे, पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर, सोडिअम हायपोक्लोराईड,

तुरटी वापर करावा, अशा सूचना सीईओ जंगम यांनी दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages