मोठा निर्णय, राज्यात हुक्का बारवर पूर्ण बंदी;
तंबाखू खरेदीसाठी वयाची अट अन्....
मुंबई (कटूसत्य वृत्त):-कर्नाटक राज्य सरकारने हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घातली. तसेच तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्याचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे केले. दरम्यान, राष्ट्रपतींनी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातींवर बंदी आणि व्यापार आणि व्यावसायिक उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) कर्नाटक सुधारणा कायदा-2024 ला मंजुरी दिली. हे विधेयक फेब्रुवारी 2024 मध्ये दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. 2003 च्या केंद्रीय कायद्यात हे नियम कर्नाटक राज्यात लागू करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सरकारने आता अधिसूचना जारी केली आहे. राज्यात 21 वर्षांखालील व्यक्तींना सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणार नाहीत. तंबाखू उत्पादने खरेदी करण्यासाठी सध्याचे किमान वय 18 वर्षे आहे. आता ते वय 21 वर्षे केले आहे.कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यास मनाई आहे. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ वापरू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि व्हेपिंगला परवानगी नाही.हुक्का बार उघडणे, विकणे किंवा चालवणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती रेस्टॉरंट, पब, बार किंवा रेस्टॉरंटसह कोणत्याही ठिकाणी हुक्का बार चालवू शकत नाही.
200 वरून 1000 रुपयांचा दंड नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 200 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत दंड करण्यात आला आहे. हुक्का बार चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत कारावास आणि किमान 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. स्वतंत्र 'स्मोकींग झोन'ला मान्यता तीस खोल्या असलेल्या हॉटेल्स किंवा तीस किंवा त्याहून अधिक व्यक्ती बसण्याची क्षमता असलेल्या रेस्टॉरंट्स आणि विमानतळांमध्ये ‘स्मोकींग झोन' (धूम्रपानासाठी जागा) किंवा ठिकाण उपलब्ध करून दिले जाऊ शकते.
0 Comments