हगवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनरला लागला हुंडाबळीचा डाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

हगवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनरला लागला हुंडाबळीचा डाग

 हगवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनरला लागला हुंडाबळीचा डाग

 सोलापुरातील शेतकऱ्याने मांडली वाहनाची व्यथा

करमाळा (कटूसत्य वृत्त):-वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंडाबळीमुळे जीव जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सातत्याने हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

पण या घटनेनंतर हुंड्यासोबतच चर्चा होत आहे ती फॉर्च्युनर. कारण वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच कस्पटेंनी शशांक हगवणे याला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर दिली होती. ज्याची किल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हगवणेंना देण्यात आली. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये फॉर्च्युनरची सर्वाधिक चर्चा रंगली असून एखादी फॉर्च्युनर दिसल्यास ही गाडी हुंड्यामध्ये तर मिळाली नाही ना किंवा लुबाडून तर घेतली नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे आणि प्रत्यक्षात असे घडत असल्याने सोलापुरातील करमाळा येथील एका शेतकऱ्याने आपल्या फॉर्च्युनरवर असे काही लिहिले आहे की, यामुळे सर्वांनाच हसू फुटले आहे.

ग्रामीण भागात जर का कोणाकडे फॉर्च्युनर दिसली तर ही गाडी हुंड्यामध्ये तर मिळाली नाही ना किंवा लुबाडून तर घेतली नाही ना? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एका शेतकऱ्यासोबत असे काही घडत आहे की, त्याने फॉर्च्युनरवर असे काही लिहिले आहे की, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. करमाळ्यातील एका शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर ही गाडी असून त्याला ही गाडी हुंड्यात मिळाली की त्याने सासरच्यांकडून बळजबरीने घेतली, असा प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे. ज्यामुळे त्याने आता गाडीवरच असे काही लिहिले आहे की, ज्यामुळे ही गाडी त्या शेतकऱ्याने रोख पैशाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गाडी हगवणे कुटुंबामुळे तिचे नाव बदनाम झाल्याची आपली व्यथा असल्यासारखे शब्द या गाडीच्या मागच्या बाजूस असलेल्या काचेवर लिहिण्यात आले आहेत.

करमाळ्यातील या शेतकऱ्याने गाडीच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर लिहिले आहे की, "तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला 'हगवणे' यांनी! मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा…! अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणेमुळे 'फॉर्च्युनर' जातीला लोकांनी धु धु धुतलंय…!" असे या काचेवरील मागील बाजूस लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनर या सर्वात अलिशान आणि लोकांची पहिल्या क्रमांकाची पसंती असलेल्या वाहनाला हुंडाबळीचा डाग लागला असल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages