भाजपाची वक्रदृष्टी; जिल्ह्यातील १०२ कामांना डच्चू, माळशिरस तालुक्याला झटका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

भाजपाची वक्रदृष्टी; जिल्ह्यातील १०२ कामांना डच्चू, माळशिरस तालुक्याला झटका

 भाजपाची वक्रदृष्टी; जिल्ह्यातील १०२ कामांना डच्चू, 

माळशिरस तालुक्याला झटका 

                                                                                   

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-भाजपा महायुतीचे सरकार सध्या सोलापूर जिल्ह्यावर सुड उगवण्याचे काम करताना दिसत असून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १०२ कामांना या सरकारने खीळ घातली असून त्यामध्ये सर्वाधिक माळशिरस  तालुक्यातील २३ कामे रद्द करून राजकीय बदला घेण्याचे काम भाजपा प्राधान्याने करताना दिसते आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपा विषयी संतापाची लाट पसरली असून येथे सातत्याने बरळणारे काही भाजपाचे नेते देखील याविषयी मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत या सोलापूर जिल्ह्याने भाजपाला नाकारल्यानंतर विधानसभेत देखील अख्ख्या महाराष्ट्रात चित्र वेगळे आणि सोलापूर जिल्ह्यात वेगळेच राजकीय चित्र दिसले. त्यामुळे हा जिल्हा आपल्या हाती कधीच लागणार नाही. क्रांतीकारकांचा स्वाभिमानी जिल्हा म्हणून या जिल्ह्याने आपली ओळख कधीही मिटू दिली नाही. राज्याच्या राजकारणात कसेही वातावरण झाले तरी या जिल्ह्याने मात्र आपला स्वतंत्र बाणा टिकवला आहे. यामुळेच सोलापूर जिल्हा भाजपाच्या मनात नेहमी खुपताना दिसत आहे. भाजपाचे या जिल्ह्यात देखील काही पावरफुल्ल नेते आहेत मात्र त्यांना मंत्री पदाची संधी न देता इतर जिल्ह्यातील पालकमंत्री या जिल्ह्यावर लादला आहे. सातत्याने भाजपा या जिल्ह्याला दुजाभावाची वागणूक देताना दिसत आहे. इतर नेत्यांना या जिल्ह्यावर राज्य करण्यासाठी या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे असे एकूणच भाजपा एक वेगळेच धोरण या जिल्हाविषयी राबवताना दिसते आहे.या जिल्ह्यावर त्यांचा काडीचाही विश्वास राहिलेला दिसत नाही. त्यामुळेच ते सातत्याने या जिल्ह्याला डावलताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे २५१५ १२३८ या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुचवलेली सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १०२ कामे या सरकारने रद्द केली आहेत. जवळपास १० कोटी २८ लाखाची ही महत्त्वाची कामे रद्द करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यावर हा खूप मोठा अन्याय झाला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपा विषयी संतापाची लाट उसळली फटक असून याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. भाजपाकडून सातत्याने जिल्ह्याला सापत्न वागणूक मिळत असल्याने भाजपातील काही नेते मंडळी देखील खाजगीत खदखद व्यक्त करताना दिसत आहेत. तर काही नुसते बोलघेवडे नेते म्हणून घेणारे यावर मात्र चिडीचूप असल्याचे चित्र आहे. माळशिरस तालुक्याला महत्त्वाची कामे रद्द करून भाजपाने तालुक्याला जोर का झटका दिला आहे. यावर भाजपा भाजपा म्हणणारे काही राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते अबोल असल्याचे पाहायला मिळत आहे आणि इतर वेळी मात्र त्यांची नुसती चर्पटपंजरी ऐकावी लागते त्यामुळे जनता जनार्दन सध्या या अशा भ्रामक नेते मंडळींना आणि भाजपाला सुद्धा हिसका दाखवण्याची तयारी करताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages