यंदा सोलापूर विद्यापीठाचा निकाल लवकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 13, 2025

यंदा सोलापूर विद्यापीठाचा निकाल लवकर

 यंदा सोलापूर विद्यापीठाचा निकाल लवकर



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदा परीक्षांचे निकाल जलदगतीने जाहीर करत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरूंच्या विशेष प्रयत्नांमुळे तसेच परीक्षा मूल्यांकन विभागाने अंतिम सत्राचे २५ निकाल अवघ्या १५ दिवसांत लावले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रिया वेळेवर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. या जलद निकालामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचला आहे. त्यांना पुढील वाटचालीस लवकर सुरुवात करता येणार आहे. अशाच पद्धतीची निकालाची गती कायम राहिल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे.


चौकट

१५ दिवसांत लागलेले निकाल
एम.एड., एम.पी.एड., एम.ए. म्युझिक, एम. ए. योगा, एम. ए. ड्रॅमेस्टिक, एम.
ए. संस्कृत, एम. ए. रुरल डेव्हलपमेंट, एम. सीए सायन्स, एमएसी
एन्व्हायरमेंट सायन्स, एमएसी जिओइन्फॉरमॅटिक्स, एमएसी स्टॅटिस्टिक्स,
एमएसी अप्लाइड जिओलॉजी, एमएसी पॉलिमर केमिस्ट्री, एमएसी मेडिसिनल
केमिस्ट्री, एमएसी फिजिक्स मटेरियल सायन्स, एमएसी झूलॉजी, एमएसी
एनालिटिकल केमिस्ट्री.

विद्यापीठाचे उर्वरित निकाल
काही अभ्यासक्रमांचे निकाल जलदगतीने जाहीर केल्यानंतर उर्वरित सर्व
परीक्षांचे निकाल पुढील एका महिन्यात जाहीर करण्याचे नियोजन परीक्षा
विभागाने केले असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages